“भारताचा एशिया कप विजय: आगामी वर्ल्डकप साठी याचा अर्थ काय”

भारताचा एशिया कप विजय: आगामी वर्ल्डकप साठी भारताने एशिया कप मधून काय कमावले.

नुकत्याच झालेल्या एशिया कप ने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या तयारीची एक आकर्षक झलक दिली. त्यांच्या दमदार सांघिक ताकदीच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवला. अनेक प्रमुख खेळाडूंनी पुनरागमन केले आणि क्रिकेटचे रोमांचक क्षण उलगडले. या ब्लॉगमध्ये, आम्ही एशिया कप स्पर्धेतील भारताची कामगिरी, त्यांनी काय साध्य केले आणि आगामी विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या संभाव्यतेसाठी कसे संकेत दिले आहेत याची माहिती घेऊ.

 

भारताची एशिया कप मोहीम:

ज्या फॉर्ममध्ये श्रीलंकेची टीम संपूर्ण एशिया कप मध्ये खेळली ते पाहता फायनल मध्ये श्रीलंका भारताला टफ देईल ही अपेक्षा होती पण या मॅचमध्ये मिया मॅजिक चाललंय आणि बुमराह-सिराज च्या पहिल्या 4 ओव्हर मध्ये 12 रनावर पाच विकेट गमावणाऱ्या श्रीलंकेचा डाव अवघ्या पन्नास रणावर आटोपला आणि भारताने ईशान किशनला ओपनिंगला पाठवत अवघ्या 6.1 ओव्हर मध्ये मॅच जिंकत एशिया कप खिशात घातला.

एक बांगलादेश विरुद्धची मॅच सोडता भारताने प्रत्येक मॅच मध्ये खेळ उंचावला.

एशिया चषक स्पर्धेत भारताला सुरुवातीच्या आव्हानांचा सामना करावा लागला, ओपनिंग ला कोण खेळणार?, फलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर कोण?, बुमराह सारख्या दुखापतग्रस्त खेळाडूंचे पुनरागमन होत असताना तो पहिले सारख्या ताकदीने बॉलिंग करेल का? ही चिंतेची बाब होती, परंतु भारतीय टीमने या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे दिली.

भारताचा एशिया कप विजय: आगामी वर्ल्डकप साठी याचा अर्थ काय
भारताचा एशिया कप विजय: आगामी वर्ल्डकप साठी याचा अर्थ काय

1. सगळ्यात मेन मुद्दा ओपनरचा

वेस्टइंडीज विरुद्धच्या सिरीज मध्ये शुभमन गिल पूर्वीच्या टच मध्ये दिसला नाही त्यात पाकिस्तान विरुद्ध च्या पहिल्या मॅच मध्येही त्याला रन करता आले नाही.पण त्यानंतर त्याची बॅट चालली नेपाळ-पाकिस्तान विरुद्ध फिफ्टी आली, बांगलादेश विरुद्ध शतक आल, टर्निंग ट्रॅक वर गेल फॉर्ममध्ये आला.

तेच रोहित शर्मा बद्दल बोलायचं झालं तर लय हरवलेला रोहित बांगलादेश विरुद्धची मॅच सोडता इतर सर्व मॅच मध्ये लय गवसल्यासारखा वाटला. गिल आणि रोहित ची जोडी परफेक्ट टाईमला फार्म मध्ये आली ते एशिया कप मुळेच.

 

2. दुसरा महत्त्वाचा विषय कमबॅकचा

बुमराह जवळपास तीन वर्षानंतर क्रिकेट खेळला तोही केवळ तीन वनडे पण तिन्ही मॅच मध्ये तो ऑफ कलर दिसला नाही किंवा त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढल नाही. बुमराह ने स्पीड आणि स्पिन चा योग्य वापर करत समोरच्या बॅट्समनला जाम करून ठेवल.

तेच K.L राहुलचं बोलायचं झालं तर त्याने कमबॅक केला थेट पाकिस्तान विरुद्ध मॅच मध्ये सेंचुरी ठोकत. त्यामुळे चार नंबरला खेळू शकणाऱ्या बॅट्समन आणि सर्वात डेंजर फास्ट बॉलर दोघांचाही कम बॅक झाला तो एशिया कपमुळेच.

 

3. मिया मॅजिक

 

बुमराह सोबतच सिराज चा फॉर्म हा तर सर्वात मेन बोनस. श्रीलंके विरुद्धच्या फायनलमध्ये स्विंगचा फायदा घेत त्यांनी एकाच ओव्हर मध्ये श्रीलंकेच्या चार टॉपच्या बॅट्समनला आउट काढत अर्धी टीम माघारी पाठवली, पण एवढ्यावरच न थांबता त्यांने पूर्ण एशिया कप मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असणाऱ्या मेंडिस ची विकेट घेत 16 बॉल मध्ये पाच विकेट या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील सर्वात फास्ट पाच विकेटच्या चामुंडा वास च्या रेकॉर्डची बरोबरीही केली.

आता हेच वर्ल्ड कपच्या दृष्टीने पाहायचं झाल्यास भारताविरुद्ध खेळणाऱ्या कोणत्याही टीमला फक्त बुमराह ची भीती नसेल तर सिराजलाही जपून खेळावं लागेल. सहाजिकच सुरुवातीच्या ओव्हर मध्ये तीन-चार विकेट काढून समोरच्या टीमला बॅक फुटवर ढकलण्याचा जो चान्स भारतीय टीम कडून आतापर्यंत सुटत होता तो आता साधता येणार आहे.

 

4.भारताची बॅटिंग हा प्लस पॉइंट

भारताची बॅटिंग हा एशिया कप मधला सर्वात मोठा प्लस पॉईंट. प्रत्येक मॅचमध्ये किमान एक दोन गडी तरी जीवाला बरं वाटेल अशी बॅटिंग करायचे.

पाकिस्तान विरुद्ध ईशांत आणि हार्दिक चालले.

नेपाळ विरुद्ध रोहित आणि गिल,

पाकिस्तान विरुद्ध पूर्ण टॉप ऑर्डर सोबत विराट- राहुलची सेंचुरी आली,

तर बांगलादेश विरुद्ध अक्षर पटेलनेही चांगले फाईट बॅक केले.

4. कुलदीप यादवची फिरकी जादू:

भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप साठी फक्त एक फुल टाइम स्पिनर ही भारताने घेतलेली सर्वात मोठी रिस्क पण ही रिस्क योग्य वाटायला लागली आहे ती कुलदीप यादव च्या फिरकी जादुमुळे कुलदीप यादवने पाकिस्तान विरुद्ध 5 आणि श्रीलंके विरुद्ध 4 विकेट घेत आपली निवड योग्य असल्याचे दाखऊन दिले आहे.

 

महत्त्वपूर्ण बाबी:

या ठळक बाबींव्यतिरिक्त, एशिया कप मधून भारतासमोर महत्त्वाचे प्रश्न ही उभे राहिले आहेत:

1. दुखापतीची चिंता:

श्रेयस अय्यरचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. तो विश्वचषकासाठी तंदुरुस्त नसल्यास भारताला स्पिन विरुद्ध श्रेयस सारख्या एका विश्वसनीय पर्यायाची गरज आहे. सध्या तरी तसा दुसरा पर्याय भारताकडे दिसत नाही.

K.L. राहुलची स्पीड कमी होते तर सूर्यकुमार यादव गरजेपेक्षा जास्त स्वीप शॉट वर अवलंबून असतो.

 

2. मध्यक्रमाची फलंदाजी:

वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर मिडल ओव्हर मध्ये बेन स्टोक्स किंवा क्लासेन सारखा तडाखेबाज बॅटिंग करणारा एक तरी बॅट्समन पाहिजे. हार्दिक आणि जडेजाचा फॉर्म बघता पहिल्या पाच पैकी एकानेच टॉप गिअर टाकणे गरजेचे आहे तर कुठे मोठा टार्गेट उभ करता येईल आणि चेस सुद्धा.

एशिया कप मध्ये कितीही म्हटलं तरी मिडल ओव्हर मध्ये भारताचे बॅट्समन डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेले होते.

 

3. बेटिंग डेप्थ वाढवायची की बॉलिंग स्ट्रेंथ

 

हार्दिक पांड्याने बॉलिंग मध्ये अतिशय चांगली कामगिरी करत वेळ पडल्यास पाचवा बॉलर म्हणून खेळण्याचं ऑप्शनही खुलं केला आहे त्यामुळे बॅटिंग स्ट्रेंथ वाढवायचे झाल्यास सहाजिकच शार्दुल ठाकूर किंवा अक्षर पटेलचा पर्याय येतो. शार्दुलला लिमिटेड संधी मिळाली पण ती तो साधू शकला नाही. अक्षर ने बॅटिंग मधे चांगली कामगिरी केली असली तरी त्याची बॉलिंग तितकी खास राहिली नाही.

त्यातच अक्षर पटेल च्या दुखापतीमुळे जर तो दुखापती मधून सावरला नाही तर त्याच्या एवजी दोन नावे समोर येतात ती म्हणजे वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन.

भारतीय टीम मॅनेजमेंटने बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला खेळावावं की बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून आर अश्विनला तुम्हाला काय वाटतं.

 

निष्कर्ष :

एशिया कप मद्ये भारताचा विजय त्यांच्या विश्वचषक मोहिमेसाठी एक आशादायक चिन्ह आहे. प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये परतले आहेत आणि भारताने अनेक गंभीर चिंता दूर केल्या आहेत. भारत एशिया कपातील यश जागतिक क्रिकेटच्या टप्प्यात नेऊ शकतो की नाही हे येणारा काळच सांगेल.

1 thought on ““भारताचा एशिया कप विजय: आगामी वर्ल्डकप साठी याचा अर्थ काय””

Leave a comment