“भारत-कॅनडा संबंध: भारताचे कॅनडाला जाश्यास तसे उत्तर”

भारत – कॅनडा संबंध हे आता खूप जास्त बिघडलेले असून भारताने कॅनडाला जाश्यास तसे उत्तर दिलेले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या, कॅनाडियन नागरिक असणाऱ्या खालीस्थान समर्थक नेता, ‘हरदिप सिंह निज्जर’ याची हत्या भारताने घडवून आणल्याचा आरोप करत कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय दुतांना कॅनडा सोडण्याचे आदेश देताच भारतीय विदेश मंत्रालय ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

भारतीय विदेश मंत्रालयाने कॅनडाचे दुत यांना बोलावून पाच दिवसात भारत सोडण्याचे सांगितले आहे. भारतीय विदेश मंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर पडताना कॅनाडियन दूत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघता भारताने कॅनडाला कडक शब्दात सुनावल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भारत कॅनडा संबंध खूप जास्त बिघडल्याचे आता दिसून येत आहे.

या ब्लॉग मद्ये आपण जाणून घेणार आहोत भारत – कॅनडा संबंध इतके बिघडण्यामागे कोणत्या गोष्टी जबाबदार आहे आणि याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो.

भारत-कॅनडा संबंध: भारताचे कॅनडाला जाश्यास तसे उत्तर
भारत-कॅनडा संबंध: भारताचे कॅनडाला जाश्यास तसे उत्तर

 

मेन मुद्दा काय ?

18 जून 2023 रोजी कॅनडा येथील एका गुरुद्वारा समोर हरदीप सिह निज्जर याची हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या संसदेमध्ये बोलत असताना कॅनडाचे प्रधान मंत्री ट्रुडो यांनी या हत्तेमागे भारताचा हात असल्याचे म्हंटले आहे. परंतु हत्येनंतर 3 महिन्यांनी ट्रुडो यांची प्रतिक्रिया येत असल्याने या मागे केवळ हत्त्या हेच कारण नसून पद्यामागे आणखी काही घडत असल्याची शंका उत्पन्न होत आहे.

G20 परिषदे साठी भारतात आलेल्या ट्रुडो यांना भारताने विशेष महत्त्व दिले नव्हते. G20 परिषदेनंतर ट्रुडो यांचे यान बिघडल्याने त्यांना दुसरे यान येत पर्यंत भारतात मुक्काम ठोकावा लागला होता परंतु तरीही भारताने त्यांना विशेष आदरातिथ्य दिले नव्हते. द्विपक्षीय वार्तेमधे मोदी यांनी ट्रुडो यांना कनडा मद्ये सुरू असलेल्या खलिस्तान समर्थन साठी कडक शब्दात फटकारले असेही बोलले जाते.

या मुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर तसेच देश पातळीवर ट्रुडो यांची बरीच मानहानी झाली.

त्याला कव्हरप करण्यासाठी म्हणूनच ट्रुडो यांनी 3 महिन्या नंतर निज्जर यांच्या हत्तेचा विषय काढत स्वतः ला देशाच्या राजकारणात बनऊन ठेवण्याची खेळी खेळली आहे.

 

कोण होता हरदीप सिंह निज्जर?

हरदीप सिंह निज्जर हा मूळ भारतीय वंशाचा शीख समुदायाचा व्यक्ती असून 1998 मद्ये भारत सोडल्यानंतर त्याने कॅनडा ची नागरिकता प्राप्त केली व कॅनडा मद्ये राहून भारताविरुद्ध खलिस्तान मूव्हमेंट चा तो प्रमुख चेहरा होता.

भारतातून पंजाब ला वेगळं करून खलिस्तान या नव्या देशाची स्थापना करण्यासाठी भारतात अनेक वेळा आतंकवादी कारवाया घडऊन आणल्यामुळे 3 वर्षा अगोदर भारत सरकार ने हरदिप सिंह निज्जर याला आतंकवादी घोषित करून मोस्ट वाँटेड लिस्ट मधे ठेवत त्याच्यावर इनामही ठेवला होता. यासोबतच आतराष्ट्रिय पोलिस संघटन इंटरपोल कडूनही त्याला रेड कॉर्नर नोटीस देण्यात आलेला होता.

 

एका आतंकवाद्यां साठी भारतासोबत संबंध खराब करून घेण्यामागे ट्रुडो ची मजबुरी काय.

या मागचे प्रमुख कारण 2025 मद्ये कॅनडा मद्ये होणार नुवडणुक आहे. कॅनडा मद्ये एकूण लोकसंख्येच्या 2.6% भारतीय पंजाबी आहे म्हणजे जवळपास 9.5 लाख लोकसंख्या पंजाबी यांची आहे त्यामधे 7.5 लाख हे शीख समुदायाचे आहेत. कॅनडा च्या राजकीय स्थिती चा विचार करता पूर्ण बहुमतासाठी 338 पैकी 170 सीट जिंकणे आवश्यक आहे. 2021 मद्ये झालेल्या निवणुकीत 17 सीट अश्या होत्या ज्यावर भारतीय विजयी झाले होते त्यापैकी 16 शीख समुदायाचे होते.

2019 मद्ये ट्रुडो यांच्या पार्टी ने 157 सीट प्राप्त केल्या होत्या तर जगमित सिंह यांच्या न्यू डेमॉक्रॅटिक पार्टी ने 24 सिटांवर विजय प्राप्त केला होता त्यामुळे ट्रुडो यांना सरकार बनविण्यासाठी न्यू डेमॉक्रॅटिक पार्टी चे सहकार्य घ्यावे लागले होते. 2025 मधेही यांच्या सहकार्याची गरज लक्षात घेत ट्रुडो हे जगमित सिंह यांना खुश करण्यासाठी जगमित सिंह हे खलिस्तान समर्थक असल्यामुळे खलिस्तान मूव्हमेंट ला हवा देत असल्याचे बोलले जाते.

 

इतर देशांची यावर काय प्रतिक्रिया राहली.

कॅनडा चे प्रधानमंत्री यांनी अमेरिका,ब्रिटन,ऑस्ट्रेलिया सहित इतरही देशातील प्रधानमंत्री यांच्याकडे या मुद्द्यावर कॅनडा चा पक्ष घेण्याची विनंती केली असली तरी अमेरिका,ऑस्ट्रेलिया यांनी भारत – कॅनडा संबंध भिघडण्याबाबत चिंता व्यक्त करण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताचे वाढते वर्चस्व याचे हे प्रतीक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही

 

भारताचे यामधे किती नुकसान किती फायदा.

भारत आणि कॅनडा मद्ये एका महत्वपूर्ण व्यापारिक संधिवर हस्ताक्षर होणार होते ज्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारात एकूण 541 अरब रुपयाची वाढ होऊ शकली असती परंतु या मुद्द्यामुळे कॅनडा ने ही संधी थांबविली आहे.

 

या व्यतिरिक्त भारत आणि कॅनडा मद्ये असणारा व्यापार हा जवळपास सारखाच आहे 2022 मद्ये दोन्ही देशांमध्ये एकूण 666 अरब रुपयांचा व्यापार झाला ज्यात भारताने 333 अरब रुपयाचे समान कॅनडा मधून आयात केले तर जवळपास तेवढ्याच किमतीचे निर्यातही,जेवढी आयात तेवढीच निर्यात भारत कॅनडा सोबत करतो त्यामुळे भारताचा कॅनडा शी व्यापार बंद झाल्यास भारताचे विशेष नुकसान होणार नाही.

Leave a comment