G-20 Summit 2023 भारतासाठी का महत्वाची आहे?

G-20 Summit 2023 भारतासाठी का महत्वाची आहे?

G-20 Summit 2023 का महत्वाची आहे व त्याचा भारताला काय फायदा होईल.

G-20 Summit 2023 भारतासाठी का महत्वाची आहे?
G-20 Summit 2023 भारतासाठी का महत्वाची आहे?

 

2023 या वर्षासाठी G-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरात देशांमधे अनेक मीटिंग पार पडल्या आणि आता याचा शेवट म्हणून G-20 परिषद आज आणि उद्या नवी दिल्ली येथे होणार असून त्यामधे 40 हुंन अधिक जागतिक नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे भारताला आपल्या उपलब्धि आणि भविष्यातील संधी जगापुढे मांडायला खूप मोठी संधी आहे.

 

G-20 काय आहे?

जगातील प्रमुख विकसित आणि विकासशिल 19 देश व 1 युरोपियन युनियन यांच्या समूहाला G-20 असे म्हंटले जाते.

जागतिक आव्हान आणि त्यावर भविष्यात करता येणाऱ्या उपयोजना यावर चर्चा करण्यासाठी १९९९ मद्ये याची स्थापना करण्यात आली होती परंतु २००८ ला आलेल्या जागतिक मंदी नंतर खऱ्या अर्थाने ही सक्रिय झाली.

 

G-20 मद्ये सहभागी देश

 1. कनाडा.
 2. फ्रान्स.
 3. जर्मनी.
 4. इटली.
 5. जपान.
 6. Uk.
 7. USA.
 8. रशिया.
 9. अर्जेंटिना.
 10. ऑस्ट्रेलिया.
 11. ब्राझील.
 12. चीन.
 13. युरोपियन युनियन.
 14. भारत.
 15. इंडोनेशिया.
 16. मेक्सिको.
 17. साऊथ आफ्रिका.
 18. साऊदी अरेबिया.
 19. साऊथ कोरिया.
 20. तूर्किये.

या देशांचा यामधे समावेश होतो.

 

भारताकडे अध्यक्षपद

दर वर्षी एका देशाकडे G-20 चे अध्यक्षपद येत असते. 1 डिसेंबर 2022 ला इंडोनेशिया कडून भारताने 2023 या वर्षासाठी अध्यक्षपद स्वीकारले होते. तर 2024 या वर्षासाठी ब्राझील अध्यक्ष असणार आहे.

वासुदेव कुटुम्बकंम : One Earth – One Family – One Future.

चा नारा देत भारताने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे.

 

G-20 महत्वाची का?

जागतिक लोकसंखेच्या 65% लोकसंख्या G-20 देशांकडे आहे.

जागतिक ट्रेड पैकी 78% G-20 देशांकडे.

जागतिक अर्थव्यवस्थेपैकी 84% अर्थव्यवस्था G-20 देशांकडे आहे.

त्यामुळे अर्थव्यवस्था,नवीन बाजारपेठ आणि भविष्यातील इतर सर्वच संधी साठी G-20 देश अत्यंत महत्वाचे ठरतात.

कोण – कोण सहभागी होणार?

 • सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख
 • आमंत्रित देशांचे प्रमुख ( या वर्षी भारताने ओमान, यूएई, बांगलादेश, नेदरलँड, मॉरिशस, स्पेन, सिंगापूर, स्पेन,नायजेरिया, या देशांना आमंत्रित केले आहे.)
 • WHO, WTO, ILO, OECD,ADB या सारख्या आंतरराषट्रीय संस्थांचे प्रमुख.

 

भारत काय साध्य करू इच्छितो?

 • भारताचे फॉरेन मिनिस्टर यांनी म्हटल्याप्रमाने भारत ग्लोबल साऊथ चा लीडर बनून जगासमोर येत आहे. त्यामुळे ग्लोबल साऊथ देशांची Devolopment आणि भविष्यात या देशांचे नेतृत्व आपल्याकडे असे राहील यावर भारताचा भर असणार आहे.

(ग्लोबल साऊथ मद्ये ते सर्व देश येतात ये अविकसित किंवा विकासशिल आहेत.)

 

 • बाली येथे 2022 मद्ये झालेल्या G-20 परिषदे मद्ये बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी WTO, WHO,ISO,World Bank यासारख्या आंतरराष्ट्रीय संगठन ग्लोबल नॉर्थ च्या इशाऱ्यावर चालत असून त्यामधे मोठे बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यामुळे परिषदेच्या निमित्ताने भारत या मुद्द्याला हात घालू शकतो.

 

 • सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकसित देशांनी विकासशील आणि अविकसित देशांना पर्यावरण संरक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा हा ही मुद्दा भारत मांडू शकतो.
 • याशिवाय इकॉनॉमिक ग्रोथ, financial stability, carbon tax यासारखे मुद्देही महत्वाचे आहेत.

Leave a comment