IND vs PAK Asia Cup 2023 | भारत विरुद्ध पाकीस्तान यांच्यातील थरार आज अनुभवता येईल लाईव्ह ते हि फुकटात | कोण पडणार कोणावर भारी, जाणून घ्या.

IND vs PAK Asia Cup 2023 | एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत पाकीस्तान एशिया कप २०२३ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आमने सामने असणार आहे, या सामन्या बाबत सर्वकाही जाणून घेऊया,

IND vs PAK Asia Cup 2023
एशिया कप २०२३ Ind vs Pak

 

कोलंबो     | भारत विरुद्ध पाकीस्तान IND vs PAK Asia Cup 2023 यांच्यात एशिया कप २०२३ मधील महामुकाबला आज श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळला जाणार आहे. |  तर टॉस अर्धा तास आधी म्हणजेच 2 वाजून 30 मिनिटांनी होईल. पाकिस्तान आणि टीम इंडिया हे दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. याआधी  पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवत जोरदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानने या विजयासह सुपर 4 च्या दिशेने एक पाउल पुढे टाकलं आहे. तर भारतीय संघाचा एशिया कप २०२३ मधील हा पहिलाच सामना असणार आहे.

 

IND vs PAK Asia Cup 2023 | भारतीय संघ आशिया कपमध्ये विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी तयार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

 

IND vs PAK Asia Cup 2023 | भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पार पडणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा श्रीलंकामधील कँडी शहरातील पल्लेकेल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Table of Contents

IND vs PAK Asia Cup 2023 | भारत-पाक सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर टॉस अर्धा तास आधी म्हणजेच 2 वाजून 30 मिनिटांनी होईल.

डिजीटल स्ट्रिमिंग कुठे पाहायला मिळेल?

IND vs PAK Asia Cup 2023 | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना मोबाईलवर अगदी फुकट पाहता येईल. त्यासाठी तु्म्हाला हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ओपनिंगला कोण येणार?

सामना कोणताही असो, सलामी जोडीवर टीमला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असते. हीच जबाबदारी कॅप्टन रोहित आणि शुबमन गिल या ओपनिंग जोडीवर असणार आहे. पावर प्लेच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये जोरदार हिटींग करुन टीमला चांगला स्कोअर करुन देण्याचा प्रयत्न रोहित-शुबमनचा असणार आहे.

मधल्या फळीत कोण?

केएल राहुल हा दुखापतीमुळे पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झालेला आहे. विराट कोहली तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर चौथ्या स्थानी खेळू शकतात. ईशान किशनचा टीममध्ये विकेटकीपर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. ईशान पाचव्या स्थानी खेळू शकतो. तर सूर्यकुमार यादव याला डच्चू मिळू शकतो. ऑलराउंड हार्दिक पंड्या सहाव्या आणि रविंद्र जडेजा सातव्या स्थानी बॅटिंगसाठी उतरतील. या दोघांवर अखेरच्या टप्प्यात जोरदार फटकेबाजी करत फिनीशिंग टच देण्याचा प्रयत्न असेल.

कुलदीपला डच्चू अक्षरला संधी!

रोहित हार्दिक आणि जडेजा या दोघांव्यतिरिक्त आणखी तिसरा ऑलराउंडरचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. रोहित कुलदीप यादव याला वगळून अक्षर पटेल याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकतो. त्यामुळे कुलदीपला पुन्हा बाहेर बसावं लागू शकतं.

फास्ट बॉलर कोण?

वेगवान बॉलिंगची जबाबदारी ही टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तिघांवर असणार आहे. टीमला सुरुवातीला झटपट विकेट्स देऊन डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्याचं आव्हान या तिघांवर असेल.

1 thought on “IND vs PAK Asia Cup 2023 | भारत विरुद्ध पाकीस्तान यांच्यातील थरार आज अनुभवता येईल लाईव्ह ते हि फुकटात | कोण पडणार कोणावर भारी, जाणून घ्या.”

Leave a comment