IND VS PAK Match रद्द | Asia cup 2023 | india vs pakistan match | पावसाने भारताला वाचवल की डूबवल?

Asia Cup 2023 | IND VS PAK Match | रद्द झाली पण याचा नेमका भारतीय संघाला फायदा झाला कि नुकसान?

IND VS PAK Match रद्द | Asia cup 2023 | india vs pakistan match | पावसाने भारताला वाचवल की डूबवल?
IND VS PAK Match रद्द | Asia cup 2023 | india vs pakistan match |

 

कोलोम्बो : Asia Cup 2023 | IND VS PAK Match पाऊस येण्याची शक्यता असूनही टीम इंडिया ने नाणेफेक जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानी पेस अटॅक समोर ५० ओवर मध्ये केवळ २६७ धावांचं लक्ष पाकिस्तान ला दिल. दुसऱ्या इंनिंग ला पावसामुळे मॅच सुरूच होऊ शकली नाही आणि शेवटी पाऊस न थांबल्याने मॅच रद्द झाली पण याचा नेमका फायदा कोणाला झाला जाणून घेऊया,

मॅच रद्द झाली नसती तर पाकिस्तान ला २६७ रन काढणे शक्य होत का ?

 

जसप्रीत बुमरहा, मोहम्मद सिराज,शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, असल्या भारी बोलिंग अटॅक समोर रण करणे पाकिस्तान ला जड गेल असत का ? तर नक्कीच जड गेल असत.पण पाकिस्तान चि सर्व बॅटिंग लाईनप फॉर्म मध्ये त्यात दवामुळे बॉल ओला झाला कि बॉलिंग करायला अवघड आणि मोठ्या स्कोर चे प्रेशर हि पाकिस्तानी प्लयेर वर नव्हते त्यामुळे पाकिस्तान ने मॅच काढली असती हि शक्यता हि नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाने भारताला वाचवील कि जिंकण्याचा चान्स गमावून डूबवल हा प्रश्न महत्वाचा आहे.

भारत टॉस मध्ये चुकला का?

मॅच दरम्यान पाऊस होऊ शकतो याची शक्यता आधीच वर्तविली गेली होती, मॅच च्या दिवशी सकाळी जरी पाऊस झाला नव्हता तरी ढगाळ वातावरण कायम होत अश्यात टॉस जिंकणारी टीम अगोदर बॉलिंग करेल अशीच शक्यता होती कारण दुसर्या इंनिंग मध्ये पाऊस झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार स्कोर चि गणित बदलतात आणि त्याचा फायदा होतो नंतर बॅटिंग करणाऱ्या टीम ला तरीही रोहित शर्मा ने टॉस जिंकत अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु ओपनिंग ला आलेले भारतीय खेळाडू शाहीन आफ्रिदी च्या बॉलिंग समोर पूर्णपणे फ्लॉप गेले. ईशांत किशन आणि हार्दिक पांड्या यांनी १३८ रण ची पार्टनरशिप केली नसती तर टीम इंडिया ला २०० चा आकडा पार करणे ही कठीण गेले असते अशी परस्थिती इंडियन टीम ची झाली होती.या वरून पेस अटॅक समोर भारतीय खेळाडू तेवढं चांगल खेळू शकत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झालं.

भारतीय बॅटिंग पुन्हा गंडली

 Asia Cup 2023 | IND VS PAK Match आयपीएल सारख्या फॉरमॅट मधे खचून रण काढणारे शुभमन गील, श्रेयस अय्यर, सारखे प्लेअर तर फ्लॉप गेलेच शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मद्ये आपल्या बॅटिंग चा लोहा मानवणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे दिग्गज ही पेस ला पचवू शकले नाही. भारताच्या दहाही विकेट पाकिस्तान च्या फास्ट बॉलर नि काढल्या. इंडिया मॅच हरली असती तर खापर टॉप ऑर्डर वरच फुटल असत हे नक्की.

मॅच रद्द झाली याचा नेमका फायदा कोणाला झाला?

पाकिस्तान ने याआधीच नेपाल ला हरवून 2 points मिळविले होते आणि रद्द झालेल्या मॅच मुळे 1-1 point दोन्ही संघात वाटल्या गेल्याने आता पाकिस्तान ने 3 points सोबत सुपर ४ मधली आपली जागा पक्की केली आहे तर भारताला सुपर 4 मध्ये जाण्यासाठी कोणत्याही परस्थितीत नेपाल सोबत होणार्या मॅच मध्ये जिंकणे आवश्यक आहे. तुम्हाला जर वाटत असेल कि नेपाल हलकी टीम आहे तिला भारत सहज हरवेल तर थांबा ! कारण धोका नेपाल चा नाही तर पावसाचा आहे.

नेपाल सोबत होणाररी मॅच मध्ये देखील असाच पावसाने गेम केला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार नेपाल जिंकला तर भारताच सुपर 4 मध्ये जाण्याच स्वप्न हि डुबेल.

त्यामुळे पावसामुळे मॅच रद्द झाल्याने भारताला फायदा कमी आणि नुकसानच जास्त झाल अस म्हणावं लागेल.

Leave a comment