Ind vs Pak super 4 Match : Asia Cup 2023 आज पुन्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार.

Ind vs Pak super 4 Match : Asia Cup 202 पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भारत – पाकिस्तान संघ आज पुन्हा  एकमेकांशी भिडणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस मेजवानी घेऊन आलेला आहे.

Ind vs Pak super 4 Match : Asia Cup 2023 आज पुन्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार.
Ind vs Pak super 4 Match Asia Cup 2023

 

सामना : दुपारी तीन वाजेपासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स
स्ट्रिमिंग: डिझ्नी हॉटस्टार

Ind vs Pak super 4 Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत – नेपाल सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमींनी नाराजी झाली होती. आज पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार अनुभवता येणार आहे. पण पावसाचा धोका अजूनही कायम आहे.

पावसाची शक्यता किती?

हवामानाच्या अंदाजानुसार आजच्या Ind vs Pak super 4 Match सामन्यात 90% पावसाची शक्यता आहे त्यामुळे आज सामना होऊ न शकल्यास उद्याचा राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे परंतु उद्याही 90% ऐवजी 100% पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोलंबो मद्ये हवामान कोरडे रहल्यास हा चमत्कारच म्हणावा लागेल.

राखीव दिवसावरून वाद

 

भारत पाकिस्तान सामन्याची अनेक क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात, याला प्रायोजक आणि प्रसारकही अपवाद नाही. त्यामुळे प्रसारक या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात आणि पावसामुळे सामना रद्द झाल्यास त्यांना मोठे नुकसान होत असते. त्यामुळेच भारत – पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा दबाव प्रसारकांकडून होता, आणि अंतिम क्षणी Ind vs Pak super 4 Match साठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

परंतु या निर्णयावर बांगलादेश आणि श्रीलंका बोर्ड ने आक्षेप घेत आमच्या मॅचसाठी देखील असा निर्णय का घेण्यात आला नाही असा प्रश्न केला आहे. श्रीलंकेने तर आम्ही asia cup चे गतविजेता असूनही भारत – पाकिस्तान यांच्यावरच विशेष लक्ष केंद्रित करून आम्हाला दुय्यम वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

K.L. राहुल की ईशान कोणाला मिळणार संधी

Ind vs pak super 4 match लढतीला समोर जाण्यासाठी अंतिम संघात दोघांपैकी कुणाला संधी द्यावी यावरून भारतीय व्यवस्थापन द्विधा मनःस्थितीत आहे.
किशनने गेल्या महिन्याभरात चार सामन्यात चार अर्धशतके ठोकली तर पाकिस्तान सोबत झालेल्या मागील मॅच मधेही त्यांनी 82 रण ची खेळी केली.सलामीवीर ते पाचव्या स्थानावर तो सहज खेळतो, त्यामुळे त्याला झूकते माप मिळायला हवे.
तर दुसरीकडे K.L राहुल दुखापतीमुळे यंदा एकही सामना खेळला नसला तरी त्याचे जुने आकडे दमदार आहे 18 सामन्यात 53 च्या सरासरीने 742 धावा केल्या ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकाचा समावेश आहे.

जसप्रीत बुमराह परतणार.

बुमराह आपल्या मुलाच्या जन्मा निमित्त मुंबई मद्ये आल्यामुळे पहिल्या मॅच मद्ये खेळू शकला नव्हता आता बुमराह परतल्यामुळे भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत होईल.

संभावित टीम

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन/K.L. राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव.

पाकिस्तान : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान(उपकर्णधार), फकर जमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तकर अहमद, मोहम्मद रिझवान,फहीम अश्रफ, नसीम शहा, शाहीन शाह आफ्रिदी, हरीश रौफ.

Leave a comment