मराठा आरक्षण : मराठा आणि कुणबी फरक काय

मराठा आरक्षण मद्ये चर्चेत असणारे मराठा आणि कुणबी नेमका  फरक काय ते आज आपण जाणून घेऊया

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. सरकारने अनेक वेळा आपले प्रतिनिधी पाठवून जीआर पाठवून उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मराठ्यांना जोपर्यंत सरसकट कुणबी दाखले दिल्या जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे.

मराठी हे कुणबीच आहे त्यामुळे त्यांना कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात त्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जरांगे पाटील करत आहे.

परंतु मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध आहे आरक्षणाचा लाभ घेनाऱ्या अनेक कुणबी समाजातील लोकांनी सुद्धा मराठ्यांना कुणबी समाजात सामील करून घेण्यास विरोध केला आहे.

मराठा आरक्षण: मराठा आणि कुणबी फरक काय
मराठा आरक्षण: मराठा आणि कुणबी फरक काय

त्यामुळे मराठा आणि कुणबी नेमका फरक काय आहे दोन्ही समाज एकच असल्याचे किंवा वेगळे असल्याचे काही ऐतिहासिक पुरावे आहेत का याबद्दल जाणून घेऊया.

कुणबी म्हणजे कोण

कुणबी म्हणजे शेती करणारा समाज अशी नोंद इतिहासात आढळते कुणबी शब्दाची फोड केल्यास कून + बी असा होतो त्याचा अर्थ कुटुंबी किंवा कोळंबी असा होतो या दोन्ही शब्दाचा मराठी अर्थ शेतकरी असाच होतो. अँट्रोपोलोजिकल सर्वे ऑफ इंडियानुसार कुणबी हा शब्द कुण + बी या दोन शब्दापासून बनलेला आहे कुण म्हणजे लोक आणि बी म्हणजे बिया एक बी टाकून त्याच्या अनेक बिया करणारे लोक असा याचा अर्थ होतो.

काही इतिहासकारांकडून कुणबी शब्दासाठी मनुस्मृतीचा सुद्धा दाखला दिला जातो मनुस्मृतीनुसार एका नांगराला सहा बैल अशा प्रकारे दोन नांगराने नांगरली जाईल एवढी जमीन म्हणजे एक कूण आणि या जमिनीचा प्रमुख म्हणजे कुनपती, कुणबी असा लिहिला जातो त्यामुळे एकंदरीत शेती करणारा समाज असाच याचा अर्थ होतो.

आर व्ही रसेल आणि हिरालाल यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेल्या टाइप्स अँड कास्ट ऑफ सेंट्रल प्रोविअन्स ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी ही महाराष्ट्रातील जात असून त्यांचा कुणबी कोळंबी फुलवाडी असा उल्लेख आढळतो.

वर्णव्यवस्थेमध्ये शेती करणारे लोक शूद्र वर्णात क्लासिफाईड केल्या गेल्याने ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांच्या पलीकडे हा वर्ण असल्याने शिक्षण आर्थिक स्थिती आणि सत्ता यापासून हा समाज वर्षानुवर्ष मागास राहिला त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जेव्हा जातीनिहाय आरक्षण दिला जात होते तेव्हा मागासलेपणा दाखवून देण्यात कुणबी समाजाला हे दाखले उपयोगी पडले.

आता पाहूया मराठा कुंनबी पेक्षा वेगळा आहे असं का म्हटलं जातं

मराठा नेमका कोण

मराठा समाजाविषयी सांगण्यात येणाऱ्या अनेक थेरी पैकी एक म्हणजे मराठा हे क्षत्रिय होते. महाराष्ट्रात शासन करणाऱ्या राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, भोज, वाकातक गुर्जर, शिलाहार, यादव या राजवंशाशी मराठा समाजाचा संबंध सांगितला जातो. सातवाहन वंशाने महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर राज्य केले तेव्हा त्यांच्या काळात महारट्ठी हे आजच्या कलेक्टर सारखे पद होते त्याचेच पुढे जाऊन मराठा झाले.

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी देखील मूळ आणि कुळ चे झालेले प्रकरणाचा संदर्भ मराठे क्षत्रिय असल्याचे सांगण्यासाठी देण्यात येतो.

दुसरी थियरी मराठा कुणबीच होते

मराठ्यांना सत्ता मिळाली असली तरी त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीत होता युद्धाच्या काळात लढणे परराष्ट्रात मोहिमेवर जाणे आणि परतल्यावर पुन्हा शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात शेती करणारे कुणबी मोठ्या प्रमाणात महाराजांच्या सैन्यात होते आणि त्यांनी आपल्या नावासमोर कुणबी मराठा लावायला सुरुवात केली त्यामुळे मराठा आणि कुणबी एकाच जाती समूहातील असून सत्तेत गेलेले संपन्नता मिळवलेले कुणबी असा उल्लेख काही संपादक मराठ्यांसाठी करतात.

संत तुकाराम म्हणतात,

बरा कुणबी केलो | नाहीतर दंभ्याची असतो मेलो.

मात्र तुकाराम महाराजांच्या वारसदारांना मराठा म्हणून ओळखले जातात.

महात्मा फुलेंनी त्यांच्या साहित्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचे म्हटले आहे.

शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांचे धंदे दोन शेतकरी आणि शिपाही गिरी असं म्हटलं होतं.

अगदी ग्वालियरचे सिंधिया, बडोद्याचे गायकवाड हे देखील कुणबी होते राजसत्ता आल्याने त्यांचा उल्लेख मराठा कुणबी केला गेला.

आजही महाराष्ट्र बाहेर ज्योतिरादित्य सिंधिया मराठा कुणबी असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो.

जेव्हा इंग्रजांची सत्ता आली तेव्हा मराठ्यांची सत्ता गेल्यानंतर ते पुन्हा शेतीकडे वळले व मराठा कुणबी हा फरक आणखीनच कमी झाला.

यानंतर पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रात शेती करणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्यास सुरुवात केली. पंजाबरावांचे वर्चस्व असलेल्या विदर्भातील मराठा समाज कुणबी समाजात समाविष्ट झाला परंतु मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने आम्ही क्षत्रिय असून स्वतःला मागासले का म्हणून घेऊ असे मनात कुणबी समाजात समाविष्ट होण्यास नकार दिला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कागदोपत्री कुणबी व मराठा असे दोन उल्लेख होण्यास सुरुवात झाली.

आता मात्र जरांगे पाटलांनी शेती करणारा कुणबी हा गुण ओळखून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात शेती करणाऱ्या मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे दाखले देऊन कुणबी समाजात समाविष्ट करून घ्यावे व ओबीसी आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी लावून धरली आहे.

Leave a comment