सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना या योजनेमध्ये दरवर्षी किमान २५० रुपये भरणे आवश्यक आहे तसें न केल्यास सादर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरु करण्यासाठी जितकी वर्ष खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला ५० रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरु केले जाईल.
सुकन्या समृद्धी योजना १०० टक्के सुरक्षित योजना मानली जाते.

चला तर जाणून घेऊया योजने बद्दल संपूर्ण माहिती.

सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना

 

सुकन्या योजना किती वर्षापर्यंत आहे?

-विशेष बाब म्हणजे या योजनेची मॅच्युरिटी २१ वर्ष आहे. परंतु पालकांना यामध्ये केवळ १४ वर्षाची गुंतवणूक करावी लागेल. बाकी वर्ष व्याज वाढतच राहते. या योजनेत गुंतवलेली रक्कम मॅच्युरिटी नंतर ३ पट असेल. सध्याचा व्याजदरावर या योजनेद्वारे कमाल ६४ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उभारता येईल.

आपण सुकन्या समृद्धी खाते ऑनलाईन उघडू शकतो का?

तुम्ही कोणत्याही अधिकृत बँक शाखेत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता. तुम्ही तुमचा नेट बँकिंग सुविधेचा मदतीने ते ऑनलाईन देखील सेट करू शकता. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रे आहेत : SSY खाते उघडण्याचा फॉर्म.

पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृद्धी खात्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

केवायसी दस्तऐवज जसे कि मुलीचे पालक / कायदेशीर पालक यांचा ओळख पुरावा, पत्ता पुरावा, इ. रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे प्रारंभीक ठेव रक्कम .

सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोण पात्र आहेत?

सुकन्या समृद्धी योजना ही “बेटी बचाओ -बेटी पढाओ “ या उपक्रम अंतर्गत मुलींना लाभ देण्याचा उद्देशाने तयार केलेली सरकारी बचत योजना आहे. १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचा मुलीचे पालक किंवा पालक या योजने अंतर्गत खाते उघडू शकता.

Leave a comment