आपण शिक्षक दिन का साजरा करतो Why we celebrate Teachers day | dr. sarvepalli radhakrishnan information in marathi.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (dr.sarvepalli radhakrishnan) यांच्या जयंती निमित्त आपण ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (teachers day) म्हणून साजरा करत असतो परंतु एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनी शिक्षक दीन साजरा होतो म्हटल्यावर त्याच्यात काहीतरी विशेष असले पाहिजे, चला तर जाणून घेऊया | dr. sarvepalli radhakrishnan information in marathi.

 

आपण शिक्षक दिन का साजरा करतो Why we celebrate Teachers day | dr. sarvepalli radhakrishnan information in marathi.

कोण होते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांच्या जयंतीला आपण शिक्षक दीन (teachers day) म्हणून साजरी करतो?

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते.

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ( sarvepalli radhakrishnan) यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ ला तामिळनाडू राज्यातील एका छोट्याश्या खेड्यात झाला. लहान पणापासून च कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त करत पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र या विषयात त्यांना विशेष रुची होती.

 

यामुळेच १९१८ ते १९२१ या काळात मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य करीत असताना म्हैसूर विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरविले. भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

 

१९२१ -१९३१ कोलकत्ता विद्यापीठ मद्ये प्राध्यापक, १९३१-१९३६ आंध्र विद्यापीठ चे कुलगुरू, १९३९-१९४८ बनारस विद्यापीठाचे कुलगुरू, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक अशी त्यांची संपूर्ण कारकीर्द होती.

 

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन – एक थोर तत्वचींतक.

 

पाच्छिमात्य जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देणारे अशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ख्याती आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञान, अध्यात्मिक जीवन पद्धती, सांस्कृतिक परंपरा या बध्दल त्यांना विशेष आकर्षण होते.

 

नीतिमान परंतु चिकित्सक, विज्ञानोमुख परंतु अध्यात्म्पवन अशी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हावा असा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. प्राचीन भारतीय तत्वचींतनाचे वैभव जगाला आधुनिक पद्धतीने समजाऊन कशे सांगता येईल याचा ते नेहमी विचार करीत असे

भारतीय शिक्षण क्षेत्रात त्यांच्या या अमूल्य योगदानामुळे त्यांची जयंती आपण शिक्षक दिवस म्हणून साजरी करत असतो.

 

मित्रांनो तुम्हाला आमचा आपण शिक्षक दिन का साजरा करतो Why we celebrate Teachers day | dr. sarvepalli radhakrishnan information in marathi. हा लेख आवडला तर नक्की शेअर करा

तुम्ही आमच्या http://www.vidarbha24.com या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

Leave a comment